LIC कडून स्मार्ट पेन्शन प्लॅन लाँच, एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर पेन्शन मिळवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
LIC New Smart Pension Plan Scheme : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं ग्राहकांसाठी स्मार्ट पेन्शन प्लॅन लाँच केला आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमकडून ग्राहकांसाठी स्मार्ट पेन्शन योजना लाँच केली आहे. या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमय द्यायचा असतो. हा प्लॅन इमिजिएट एन्युटी प्लॅन आहे. वैयक्तिक आणि संयुक्तरित्या जीवन एन्युटी पर्याय उपलब्ध करुन देतो. या पेन्शन प्लॅनचं लाँचिंग वित्त मंत्रालयाचे सचिव एम. नागराजू आणि एलआयसीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी केलं.
प्लॅनच्या महत्त्वाच्या गोष्टी
एलआयसीचा स्मार्ट पेन्शन प्लॅन तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्याचा योग्य मार्ग आहे. तुम्ही या योजनेत एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता. यामध्ये एक व्यक्ती किंवा सुंयक्तरित्या संयुक्त एन्यूईटी पर्याय उपलब्ध आहे. 18 ते 100 वर्ष वयापर्यंत हा प्लॅन कोणीही खरेदी करु शकतो. एलआयसीच्या विद्यमान ग्राहकांना आणि नॉमिनीकडून अधिक परतावा मिळेल. जर 100000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु केल्यास चांगला फायदा मिळू शकतो.
पेन्शन मिळवताना ती मासिक, त्रैमासिक आणि सहामाही अशा पद्दतीनं घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला आर्थिक गरज असेल तेव्हा अंशत: किंवा पूर्ण रक्कम काढू शकता.
एनपीएस सबस्क्रायबर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. दिव्यांगांसाठी या योजनेत विशेष तरतुदी आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तीन महिन्यानंतर कर्जाची सुविधा देखील मिळते. त्यामुळं एक परफेक्ट रिटायरमेंट प्लॅन बनतो.
एखाद्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्यानं निवडलेल्या पर्यायानुसार पैसे दिले जातील. कुटुंबानं ठरवल्यास पूर्ण रक्कम काढता येऊ शकते किंवा मासिक पेन्शन घेता येऊ शकते. याशिवाय हप्त्यांमध्ये पैसे मिळवण्याचा पर्याय देखील आहे. ज्यातून वेळोवेळी रक्कम काढता येते. यामुळं कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.
हा प्लॅन कुठं खरेदी करायचा?
हा प्लॅन पॉइंट ऑफ सेल्स पर्सन्स एलआयसीकडून किंवा सीपीएससी-एसपीव्हीकडून खरेदी करु शकता. वार्षिक पर्याय आणि पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतील.
चिंता से आज़ादी, रिटायरमेंट के बाद भी इनकम की गारंटी! LIC of India की स्मार्ट पेंशन के साथ पाएँ जीवनभर की सुनिश्चित आय और अपने सुनहरे सालों का आनंद लें, बिना किसी आर्थिक चिंता के।https://t.co/YU86iMOu9M#LIC #SmartPension #PensionPlan pic.twitter.com/sljAdyonaL
— LIC India Forever (@LICIndiaForever) February 19, 2025
एलआयसीची तिसऱ्या तिमाहीत कशी कामगिरी?
एलआयसीचा खर्च घटल्यानं 2024-25 च्या तिमाहीत 11056.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

