ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2025 | बुधवार
1. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, मर्दांनी खेळांनी वेधलं लक्ष https://tinyurl.com/yc7sttat शिवरायांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी झाली, त्यांचं कार्य बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणादायी, नरेंद्र मोदींच्या शिवजयंतीनिमित्त मराठीतून शुभेच्छा https://tinyurl.com/582wreaz
2. मविआत एकनाथ शिंदे ज्युनिअर होते म्हणून मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली, पाच वर्षांनंतर संजय राऊतांचा गौप्यस्फोट, शिंदे चालणार नाहीत अशी शरद पवार आणि अजितदादांची भूमिका, राऊतांचा दावा https://tinyurl.com/56kcztky भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते; खासदार संजय राऊतांचा दावा https://tinyurl.com/3mh927r6
3. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय, सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक, नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस https://tinyurl.com/5n6e5mvk
4. मंत्रिमंडळात निर्णय नाही, पण खोटं सांगत धनंजय मुंडेंनी 200 कोटी उचलले, तारखेविना आदेश काढला, अंजली दमानिया यांचा आरोप, मुंडेंनी इफ्कोमध्ये महाघोटाळा केल्याचं सांगत पेपर दाखवले https://tinyurl.com/5ctnt9a9
5. धनंजय मुंडे- सुरेश धस भेटीमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशिटमध्येही छेडछाडीची शक्यता, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, भेटीसाठी भाजपने धसांवर दबाव टाकल्याचाही दावा https://tinyurl.com/5xjvsrzj राहुल सोलापुरकर मुख्यमंत्र्यांच्या टोळीतला, सरकारच्या आशीर्वादानेच त्याच्यावर कारवाई होत नाही, मनोज जरांगेंची सरकारवर कडाडून टीका https://tinyurl.com/dexcwdcz
6. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम, तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/3ttxuen2
7. पिंपरी चिंचवड महापालिकेने सात दिवसात फिरवला 4111 व्यवसायांवर बुलडोझर; अनेकांचे संसार उध्वस्त, राजकारणी शांत, नागरिकांचा रोष https://tinyurl.com/yd6zd3u7
8 वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदतवाढ, पुण्यात 25 लाख वाहनांना बदलावी लागणार नंबर प्लेट https://tinyurl.com/2bw84nkn
9. भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होण्याची शक्यता, रेखा गुप्तांच्या नावाचा आरएसएसचा प्रस्ताव भाजपनं स्वीकारल्याची माहिती https://tinyurl.com/ybdne948
10. राज्यात 2017 पासून करमणूक कर अस्तित्वातच नाही, त्यामुळे तो माफ करण्याचा प्रश्न नाही, छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/yh325j9d शाळा अन् कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात छावा चित्रपट दाखवा, शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/nh43uyb2
एबीपी माझा स्पेशल
बी-बियाणं पुरवली, संकटकाळी करबंदी राबवली, जमीन मोजली, छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं? https://tinyurl.com/dwk636ty
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो https://tinyurl.com/3682dn35
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

