एक्स्प्लोर

नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत, पोलीस पत्नींची भावनिक साद

नव्या इमारतीत जाता येत नसल्याचे जुन्याच वसाहतीत पोलीस कुटुंबीयांचा संसार सध्या सुरू आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सातारा : राज्य शासनाकडून सध्या पोलिसांच्या (Police) वसाहती आणि पोलीस कार्यालयांच्या इमारती नव्याने व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कार्यालयांच्या इमारतीचे भूमीपूजन केले. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून धुळखात पडून असलेल्या साताऱ्यातील (Satara) पोलीस कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचे उद्घाटन कधी होणार, असा सवाल पोलिसांच्या कुटुंबीयांना पडलेला आहे. जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी शेकडो कोटी खर्च करून मोठी प्रशस्त अशी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी या वसाहतीचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. तब्बल 700 कर्मचाऱ्यांसाठी आणि 100 अधिकारी यांना राहण्यासाठी ही वसाहत बांधण्यात आली आहे. मात्र, उद्घाटन केलं नसल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येथे राहण्यासाठी जाता येत नसल्याने ही प्रशस्त अशी वसाहत धुळखात पडली आहे.

नव्या इमारतीत जाता येत नसल्याचे जुन्याच वसाहतीत पोलीस कुटुंबीयांचा संसार सध्या सुरू आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वसाहतीचे उद्घाटन कधी होणार, आम्ही कधी तेथे राहण्यासाठी येणार अशी भावनिक साद पोलीस पत्नींनी व्यक्त केली आहे. 

लवकरात लवकर उद्घाटन करावे

साताऱ्यातील पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंब सध्या जुन्या पोलीस लाईनमध्ये राहत आहेत. या पोलीस लाईनमधील घरांची दुरवस्था झालेली आहे. घरांच्या कौलांची पडझड, भिंतींना पडलेल्या भेगा, लाइट्स, ड्रेनेज पाणी, पोलीस लाईन शेजारी असणाऱ्या उघड्या नाल्याचा वास तसेच उघड्यावर टाकत असलेला कचरा, यांसारख्या समस्यांचा नाहक त्रास पोलीस कुटुंबीयांना होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी व प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर ही नव्याने बांधण्यात आलेली वसाहत सुरू करण्यात यावी, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे

पोलीस अधीक्षकांचा बोलण्यास नकार

या गृह प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा विचार आहे. मात्र, एक ते दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झालेला हा प्रकल्प धुळखात पडला आहे. सध्या पोलीस कुटुंबियांना जुन्या घरामध्येच राहून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, या प्रकल्पाचे उद्घाटन कधी होणार, याची विचारणा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा

 दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; 'आप'ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
Embed widget