एक्स्प्लोर
Kavnya Maran : होऊ दे खर्च, काव्या मारनकडून सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीरांचे पगार दुप्पट, ट्रेविस हेड अन् अभिषेक शर्मा मालामाल
IPL Retention Updates : सनरायजर्स हैदराबादनं रिटेन्शन करताना हेनरिक क्लासेनासाठी 23 कोटी रुपये मोजले. तर कॅप्टन पॅट कमिन्सवर देखील विश्वास कायम ठेवला.

अभिषेक शर्मा , ट्रेविस हेड, काव्या मारन,
1/5

सनरायजर्स हैदराबादनं पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये दोन भारतीय आणि तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हैदराबादनं रिटेन्शनमध्ये 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता त्यांच्याकडे ऑक्शनसाठी केवळ 45 कोटी रुपये राहिले आहेत.
2/5

सनरायजर्स हैदराबादनं ट्रेविस हेड, हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा आणि नितिश कुमार रेड्डी यांना रिटेनं केलं.
3/5

काव्य मारनच्या सनरायजर्स हैदराबादनं कॅप्टन पॅट कमिन्सवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. पॅट कमिन्सला 18 कोटी रुपये मोजून संघात कायम ठेवण्यात आलं आहे.
4/5

2024 च्या आयपीएलमध्ये दुसऱ्या संघांविरुद्ध हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन देणाऱ्या अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडच्या जोडीला बक्षीस मिळालं आहे.
5/5

काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादनं गेल्या वर्षी अभिषेक शर्माला साडे सहा कोटी रुपयांमध्ये संघात स्थान दिलं होतं. तर, ट्रेविस हेडला 6 कोटी 80 लाख रुपयांना संघात स्थान देण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही सलामीवीरांना प्रत्येकी 14 कोटी रुपयांचा खर्च करुन संघासोबत कायम ठेवण्यात आलं आहे.
Published at : 01 Nov 2024 12:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion