एक्स्प्लोर
Shreyas Iyer : केकेआरनं श्रेयस अय्यरला रिटेन का केलं नाही? कोलकाता नाईट रायडर्सच्या CEO नं नेमकं काय म्हटलं?
Shreyas Iyer : कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला रिटेन केलेलं नाही. यामागील कारण आता समोर आलं आहे.

श्रेयस अय्यर
1/6

आयपीएल 2025 साठी केकेआरनं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण केकेआरनं टीमला आयपीएल ट्रॉफी मिळवून देणार्या श्रेयस अय्यरला रिटेन करण्यात आलं नव्हतं.
2/6

केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी रेव स्पोर्ट्ससोबत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. अय्यरला रिलीज करण्यामागं अनेक कारणं होती. ते म्हणाले कोणत्याही खेळाडूचं योग्य मूल्य ऑक्शनमध्ये समोर येतं.
3/6

वैंकी मैसूर यांच्या वक्तव्यातून श्रेयस अय्यरला आर्थिक कारणामुळं रिलीज करण्यात आल्याचे संकेत मिळतात.
4/6

काही मीडिया रिपोर्टसच्या दाव्यानुसार श्रेयस अय्यरनं रिटेन्शनसाठी केकेआरकडे मोठी रक्कम मागिल्याचं बोललं जातं.
5/6

वैंकी मैसूर यांनी श्रेयस अय्यरचं नाव रिटेन्शन लिस्टमध्ये पहिलं होतं मात्र काही कारणांमुळं त्याला संघासोबत ठेवता आलं नाही, असं म्हटलं.
6/6

वैंकी मैसूर म्हणाले श्रेयस अय्यर रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या स्थानी होता कारण तो कॅप्टन होता.श्रेयसनं आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरकडून आयपीएलमध्ये क्रिकेट खेळलं आहे.
Published at : 01 Nov 2024 11:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion