एक्स्प्लोर
IPL 2025 : केकेआरनं रिलीज करुनही मिशेल स्टार्कचा बोलबाला कायम, तीन संघांमध्ये मोठी चढाओढ, पैशांचा पाऊस पडणार, कोण बाजी मारणार?
IPL 2025 : आयपीएलच्या 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं मिशेल स्टार्कला संघातून रिलीज केलं होतं. मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते.

मिशेल स्टार्क
1/6

आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेहादमध्ये होणार आहे. यावेळी मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागेल. मिशेल स्टार्क देखील या यादीत आहे.
2/6

मिशेल स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं 2024 मध्ये त्याला 24.50 कोटी रुपये खर्च करुन खरेदी केलं होतं. स्टार्कवर यावेळी देखील इतर फ्रँचायजीकडून पैशांचा पाऊस पडू शकतो. कारण केकेआरनं त्याला रिलीज केलं आहे.
3/6

मिशेल स्टार्कला केकेआरनं रिलीज केल्यानं आयपीएलमधील इतर संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजू शकतात.
4/6

मिशेल स्टार्कवर पंजाब किंग्ज देखील बोली लूव शकते. सध्या पंजाबकडे मोठा खेळाडू नाही. याशिवाय रिकी पाँटिंग पंजाबचा मेंटॉर झालेला आहे. त्यामुळं पंजाब स्टार्कसाठी प्रयत्न करु शकतं.
5/6

लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्स देखील मिशेल स्टार्कवर मोठी बोली लावू शकतात. मिशेल स्टार्कला कोण खरेदी करणार हे पाहावं लागेल.
6/6

मिशेल स्टार्कनं आयपीएलमध्ये 40 मॅच खेळल्या आहेत. या दरम्यान त्यानं 51 विकेट घेतल्या आहेत. 15 धावांमध्ये 4 विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियासाठी मिशेल स्टार्कनं 65 टी 20 मॅच खेळल्या असून 79 विकेट घेतल्या आहेत.
Published at : 09 Nov 2024 09:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion