एक्स्प्लोर
Advertisement

Virat Kohli :आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा किंग कोहलीच्या नावावर,आणखी कोण कोण शर्यतीत?
IPL Facts: आयपीएलच्या 2008 च्या पहिल्या सीझनपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतोय. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचं रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे.

विराट कोहली
1/6

विराट कोहली एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. विराटनं 2016 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये 973 धावा केल्या आहेत. विराट कोहलीचं रेकॉर्ड आठ वर्षांपासून अबाधित आहे.
2/6

गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलनं 2023 च्या आयपीएलमध्ये 890 धावा केल्या होत्या. शुभमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
3/6

विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी जोस बटलर आहे. राजस्थान रॉयल्सकडून 2023 च्या आयपीएलमध्ये त्यानं 863 धावा केल्या.
4/6

केन विलियमन्सननं 2018 च्या आयपीएलमध्ये 735 धावा केल्या होत्या. तो चौथ्या स्थानावर आहे. केन विलियमन्स त्यावेळी सनरायजर्स हैदराबादकडून खेळत होता.
5/6

2012 च्या आयपीएल ख्रिस गेलनं 735 धावा केल्या होत्या. ख्रिस गेल त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता.
6/6

विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये 14 मॅचेसमध्ये 708 धावा केल्या आहेत. बंगळुरु फायनलमध्ये गेल्यास विराट त्याचं 2016 चं रेकॉर्ड मोडू शकतो.
Published at : 22 May 2024 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
