एक्स्प्लोर
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडली, रिषभ पंत आता कुठं जाणार? सुरेश रैनानं बातमी फोडली, म्हणाला...
Rishabh Pant : रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलं नाही. दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्यानंतर रिषभ पंत कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

रिषभ पंत कोणत्या संघाकडून खेळणार?
1/5

आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. दिल्लीकडून रिषभ पंतला रिटेन करण्यात आलेलं नाही.
2/5

दिल्ली कॅपिटल्स 2025 च्या आयपीएलसाठी पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे कर्णधार म्हणून नेतृत्त्व सोपवणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय रिषभ पंत मेगा ऑक्शनमध्ये जाणार असल्यानं इतर संघ देखील त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजू शकतात.
3/5

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं एका भेटीची आठवण जिओ सिनेमावर सांगितली. तो म्हणाला महेंद्रसिंह धोनीला दिल्लीत भेटलो होतो, तिथं रिषभ पंत देखील होता. कोणतरी यलो जर्सी लवकरच घातलेली पाहायला मिळेल, असं रैना म्हणाला.
4/5

रिषभ पंतनं अपघातातून क्रिकेटमध्ये कमबॅक आयपीएलच्या माध्यमातून केलं. दिल्लीनं त्याच्या नेतृत्त्वात 2024 च्या आयपीएलमध्ये 7 मॅच जिंकल्या तर 7 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
5/5

चेन्नई सुपर किंग्जनं महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड प्लेअर म्हणून रिटेन केलं आहे. धोनीचं वय आणि फिटनेस पाहता चेन्नईकडून बॅकअप म्हणून आणखी एका विकेटकीपर फलंदाजाला स्थान दिलं जाऊ शकतं. यामुळं रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल, अशा चर्चा जोरात सुरु आहेत.
Published at : 31 Oct 2024 11:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion