एक्स्प्लोर

एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 

या खरेदीसाठी विभागनिहाय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली असतानाही निविदेतील अटी शर्ती बदलल्याचं समोर आलं होतं.

Mumbai: तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून राज्यात दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा (ST Scam) झाल्याचं उघड झाल्यानंतर आता राज्य परिवहन मंळडाच्या 1310 बसच्या खरेदी प्रकरणावर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. या खरेदी प्रक्रीयेच्या निविदा सर्व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

या खरेदीसाठी विभागनिहाय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली असतानाही निविदेतील अटी शर्ती बदलल्याचं समोर आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली असून ठेकेदारावर मेहेरबानी दाखवल्याची शंका या प्रकरणात घेण्यात आली होती. हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या निर्णयामुळे एसटी महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता असल्याचे कळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले होते.

खरेदीच्या निविदांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांनी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर एसटी घोटाळ्यातील चौकशा सुरु झाल्या असून या प्रकरणातून नक्की काय पुढे येते याकडे राज्याचे लक्ष आहे.

2000 कोटींचा एसटी घोटाळा उघड

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिवहन महामंडळाने 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा दाखल केली होती. एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रचलित पद्धत मोडून विभागनिहाय गाड्या घेण्याऐवजी विभागाला तीन समुहात विभागून प्रत्येक समूहात 400 ते 450 याप्रमाणे 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला याची कल्पना नसल्याचे म्हटलंय. महामंडळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही. प्रवाशांच्या हिताच्या आणि फायद्याच्या निर्णयांनाच आमचं प्राधान्य असेल. यात तडजोड होणार नाही असेही त्यांनी वृत्त समूहाला सांगितले.

परिवहन मंडळाला बसणार 2000 कोटींचा फटका

राज्य परिवहन महामंडळाने 1310 बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आल्यानंतर या व्यवहारात परिवहन मंडळाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियांमध्ये सात वर्षांसाठी या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ढोबळमानाने 2000 कोटींचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार होता. तांत्रिक पात्रता निविदा आचारसंहिता मोडल्याचं यात समोर आलंय. आता या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचा-

राज्यात 2000 कोटींचा एसटी घोटाळा, सरकारला अंधारात ठेवून भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Embed widget