एक्स्प्लोर
Advertisement

In Pics : पेणचे बाप्पा निघाले थायलंडला

Feature_Photo_1
1/8

मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळं अनेक सणउत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आले.
2/8

यंदाच्या वर्षीही चित्र काहीसं असंच आहे. असं असलं तरीही या सणवारांबाबतची उत्सुकता मात्र तसुभरही कमी झालेली नाही.
3/8

अवघ्या तीन महिन्यांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवाची तयारी अनेक गणेश चित्रशाळांमध्ये सुरु झाली आहे.
4/8

खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, रायगड जिल्ह्यातील पेण येथेही सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे.
5/8

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण मध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात.
6/8

यावेळीसुद्धा गणेशोत्सवाच्या तीन महिने किंबहुना त्याआधीपासून इथल्या मूर्तीकारांनी लगबगीने गणरायाचं लोभस रुप साकारण्यास सुरुवात केली.
7/8

ज्यानंतर बाप्पाच्या या मूर्ती थायलंडला रवाना झाल्या आहेत. निलेश समेळ यांच्या दीपक कला केंद्र, पेण येथून या मूर्ती परदेशवारीला निघाल्या आहेत.
8/8

पहिल्या खेपेत इथून 900 गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 फूट ते 3 फूट इतक्या उंचीच्या मूर्तींचा समावेश आहे.
Published at : 09 Jun 2021 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
