Sanjay Raut Full PC : छगन भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : छगन भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण - संजय राऊत
परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. ते स्वत:ला गृहमंत्री समजतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी परभणीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. ते सोमवारी राज्यसभेत हा मुद्दा मांडणार आहेत. तत्पूर्वी सोमनाथ सूर्यवंशीबाबत राऊतांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. त्याच्या लढाईचा मार्ग चुकीचा असला परभणीच्या चौकात संविधानाच्या पुस्तकावर हल्ला झाला. संविधान वाचवण्यासाठी संघर्ष केला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, ते स्वतला गृहमंत्री समजतात. अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून आंबेडकरी कार्य़कर्ते होणे स्वाभाविक आहेत. पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे. महाराष्ट्रात संविधानविरोधी सरकार का आलं त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहेत, याचा विचार करण्याची आता गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.