मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
maharashtra cabinet expansion: तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते कल राजभवनात फिरकलेच नाहीत. आता त्यांच्यापाठोपाठ..
Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे संपन्न झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर आता नाराजी नाट्याचा खेळ सुरू झालाय. तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतल्याचं समजतंय. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील काही नेते नाराज आहेत. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते काल राजभवनात फिरकलेच नाहीत. आता त्यांच्यापाठोपाठ आमदार रवी राणा नाराज होऊन अधिवेशन सोडून अमरावतीत परतल्याची माहिती आहे. भाजपचे पाच आमदार असले तरी जिल्ह्याला एकही मंत्रीपद नसल्याने राणादांपत्य कमालीचं नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे पूर्व नागपूरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. रविवारी रात्री शपथविधी संपल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते कृष्णा खोपडे यांच्या घराजवळ गोळा झाले होते. त्यांनी भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने महायुतीत मंत्रीपद डावललेल्या आमदारांच्या नाराजीची ठिणगी पडली आहे.
रवी राणा नाराज होऊन अमरावतीत परतले..
तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा असतानाच भाजपचे रवी राणा अधिवेशन सोडून नाराज होऊन अमरावतीत परतले. अमरावती जिल्ह्यात यावेळी प्रथमच आठ पैकी सात जागांवर महायुतीचे आमदार आहेत. भाजपचे पाच आमदार जिल्ह्यात असले तरी एकही मंत्रीपद न दिल्याने राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने राणादाम्पत्य कमालीचे नाराज असल्याचं समजतंय.
कार्यकर्ते फडणवीसांना जाब विचारणार
जळगाव जामोद मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येऊ नये भाजप नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. आज शेकडो वाहनातून हजारो कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी नागपूरकडे कूच करणार आहेत.
तानाजी सावंतांची नाराजी
तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. ते आज राजभवनावर फिरकलेच नाहीत. तानाजी सावंत नाराज झाल्यामुळं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. गेल्या मंत्रीमंडळात तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. त्यामुळं यावेळी मंत्रीमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
हेही वाचा:
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा