एक्स्प्लोर
Fadnavis Delhi Daura Photos : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात 7 नेते, 5 मूर्ती !
Devendra Fadnavis Delhi Daura : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी गेले आहेत, तिथे त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक बड्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू आहेत.

Devendra Fadnavis Delhi Daura
1/10

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा होता, या दरम्यान फडणवीसांनी सर्व बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
2/10

दिल्लीतील या सदिच्छा भेटीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अनोखं दर्शन फडणवीसांनी घडवलं.
3/10

देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या.
4/10

फडणवीसांनी यात 5 वेगवेगळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.
5/10

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना फडणवीसांनी विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती दिली.
6/10

फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली.
7/10

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली प्रचाराची सुरुवात रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन केली. मोदी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात, म्हणून त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
8/10

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची मूर्ती दिली.
9/10

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती तर केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि नितीन गडकरींना सिद्धीविनायकाची मूर्ती दिली.
10/10

महाराष्ट्रात सत्ता विस्ताराची सर्व सूत्र ठरली असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलं.
Published at : 12 Dec 2024 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
