Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो, धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार; विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंचा निर्धार
Nitesh Rane : आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार, असा निर्धार करत नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nagpur Winter Assembly Session 2024 नागपूर: पहिल्यांदा मंत्री म्हणून विधिमंडळात पाऊल टाकतो आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी मी जास्तीत जास्त ताकदीने माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेल. या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टिकोनातून मी पुढे पाऊल टाकील. तसेच लव्ह जिहाद लॅण्ड जिहाद बाबतचे लढे असेच पुढेही सुरू राहतील. आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार, असा निर्धार करत नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी निर्धार करत विरोधकांवर कडाडून टीकाही केली आहे.
हिरवा गुलाल उडवणाऱ्यांना आता हिरव्या मिरच्या लागताय
विरोधकांनी ईव्हीएम विरोधातील हेच आंदोलन लोकसभेच्या निकालानंतर केलं असतं, तर लोकांना कदाचित त्यावर विश्वास बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधल्या असत्या आणि त्यावर हे आंदोलन केलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला असता. लोकांनाही आता कळून चुकले आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीही वाटलं नाही. तेव्हा हे लोक हिरवा गुलाल उडवायचे. मात्र आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आणले, हिंदू मतदार म्हणून आपली ताकद दाखवली. तेव्हा या लोकांना हिरव्या मिरच्या लागत आहेत. म्हणुन हे जे काही करत आहे तो हिंदू समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधाच्या आंदोलनाला काहीही अर्थ नाही. असेही नितेश राणे म्हणाले.
काँग्रेसला लाज वाटत नाही का? भाजपचा सवाल
दहशतवाद्यांचे केसेस लढवणाऱ्या वकिलाला आणून ईव्हीएम विरोधात रॅली काढल्याबद्दल काँग्रेसला लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. एड. मेहमूद प्राचा यांना आणून ईव्हीएमच्या विरोधात रॅली काढण्यासंदर्भात आता भाजपने ही काँग्रेस आणि विरोधी पक्षांचा विरोध सुरू केला आहे. दहशतवाद्यांचे केसेस लढवणाऱ्या वकिलाला आणून ईव्हीएमला विरोध केल्या संदर्भात काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे, असं मत भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस ईव्हीएमच्या मुद्द्यावर नौटंकी करत आहे, असा आरोप ही भाजप ने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या