एक्स्प्लोर
PHOTO : भावच नाही! केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली; झाडावरच पिकतेय केळी

Beed Banana Farming
1/10

आपल्याकडे केळी पिकवणारा शेतकरी हा बागायतदार शेतकरी समजला जातो. आता मात्र याच बागायतदार शेतकऱ्यांवर परवडत नाही म्हणून केळीचे झाड शेतीच्या बाहेर टाकण्याची वेळ आलीय.
2/10

झाडाला लगडणारी केळी काढायला सुद्धा परवडत नाही म्हणून आता अशीच पिकून खराब होऊ लागलीय. गेवराईच्या श्रीपत अंतर्वाला गावच्या वैजनाथ वाकळे यांची एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी बाग वाढवली.
3/10

मात्र विक्रीच्या वेळेस या केळीला दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतलाय.
4/10

मुबलक पाणीसाठा असल्याने श्रीपत अंतर्वाला गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. यावर्षी मात्र केळीचा बाजार उठल्याने शेतात असा केळीचा सडा पडलाय.
5/10

पूर्वी बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलचा भाव मिळणाऱ्या केळीला आता कवडीमोल भाव मिळत असल्याने भानुदास वाकळे यांना आपल्या तीन एकरावरची केळी जनावरांसमोर टाकावी लागत आहे
6/10

पारंपारिक शेतीवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणार कमी उत्पादन यामुळे अनेक शेतकरी हे वेगवेगळ्या फळबागांची लागवड करतात.
7/10

गेवराई तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती आणि त्यातून त्यांना लाखोंचा नफा मिळायचा. यावर्षी मात्र केळीला भावच मिळत नसल्यानं याच केळीच्या बागा तोडून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे
8/10

सध्या केळीला केवळ दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलला भाव आहे. म्हणजे एका किलोला दीड ते दोन रुपयांचा भाव आहे. एका किलो सहा ते सात केळी बसतात. म्हणजे या एका केळीला शेतकऱ्यांना 25 ते 30 पैशे भाव मिळतोय.
9/10

पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. आता मात्र या केळीसाठी केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे म्हणूनच बहारदार केळीच्या बागा आता उध्वस्त होऊ लागले आहेत.
10/10

पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला सुरुवात केली खरी मात्र कधी दुष्काळ तर कधी अवकाळी यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने केळी पिकवली. आता मात्र या खेळीला भाव मिळत नसल्याने हे शेतकरी मोठ्या आर्थिक कात्रीत सापडले आहेत.
Published at : 13 Jan 2022 01:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
अहमदनगर
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
