Swarget Case Datta Gade Arrest : स्वारगेट प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला मध्यरात्री दीड वाजता अटकपुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती. दत्तात्राय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे काय म्हणाले? पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो गुनाटमध्ये होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे. गावाच्या एका भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे, असं निखिल पिंगळे म्हणाले. झोन 2, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं होती. गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे, असं निखिल पिंगळे म्हणाले