Oscar 2025 : भारतात ऑस्कर पुरस्कार 2025 कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर
Oscar 2025 : जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 'ऑस्कर 2025' ची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Oscar 2025 : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) द्वारे दरवर्षी सादर केला जाणारा जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 'ऑस्कर 2025' ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. भारतातही लोक हा पुरस्कार पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. दरवर्षीप्रमाणे, यावेळीही 97 वा अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतात ऑस्कर 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे आणि केव्हा करता येईल ते जाणून घेऊयात...
2025 च्या ऑस्कर नामांकनांची अधिकृत घोषणा 23 जानेवारी रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला 17 जानेवारी रोजी नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु ते 19 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आणि नंतर लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे पुन्हा 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. आता 3 मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या बहुप्रतिक्षित पुरस्कार सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
भारतात ऑस्कर 2025 कधी आणि कुठे पाहाल?
3 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता स्टार मूव्हीज, स्टार मूव्हीज सिलेक्ट आणि जिओ हॉटस्टारवर ऑस्कर लाईव्ह पाहता येणार आहे. तर स्टार मूव्हीज आणि स्टार मूव्हीज सिलेक्टवर रात्री ८:३० वाजता हा पुरस्कार सोहळा पुन्हा पाहता येणार आहे. 3 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजेपासून भारतात ऑस्कर पाहता येईल. अमेरिकेत, हा कार्यक्रम ABC-TV वर संध्याकाळी 7 वाजता ET / 4 वाजता PT वर थेट प्रसारित केला जाईल आणि Hulu वर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.
The 97th Academy Awards streaming LIVE, March 3, 5:30 AM onwards, only on #JioHotstar! #OscarsOnJioHotstar https://t.co/V1TapnaHkc
— JioHotstar (@JioHotstar) February 27, 2025
ऑस्कर २०२५ चा होस्ट कोण?
एमी विजेते लेखक, निर्माते आणि विनोदी कलाकार कोनन ओ'ब्रायन या पुरस्काराचे आयोजन करणार आहेत. ऑस्कर होस्ट म्हणून हे त्यांचे पदार्पण आहे. ओ'ब्रायनने यापूर्वी 2002 आणि 2006 मध्ये एमी पुरस्कारांचे आयोजन केले होते. तो त्याच्या खास विनोदाने ऑस्कर पुरस्काराला संस्मरणीय बनवण्यास सज्ज आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























