एक्स्प्लोर

kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, आता गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द

kanifnath Yatra : मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्‍यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता.

kanifnath Yatra : पाथर्डी तालुक्यातील मढी (Madhi) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्‍यांना कानिफनाथ यात्रेत (kanifnath Yatra) दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्‍यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आता पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आला आहे. 

कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा असून महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. पारंपारिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेल लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. तसेच पलंग आणि गादीचा देखील वापर करत नाहीत. मात्र यात्रेतील मुस्लीम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते, त्यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी येथील ग्रामसभेत करण्यात आला होता.  यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी ठराव केला रद्द

यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ठरावाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती.  ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समितीने नोंदवले आहे. चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी पाठविला असून मुस्लीम व्यवसायिकांना यात्रेत बंदी केल्याचा ठराव नियमबाह्य ठरवत रद्द करण्यात आला आहे. 

नितेश राणे देणार मढी येथे भेट

शनिवारी मढी येथे राज्याचे मंत्री नितेश राणे हे भेट देणार आहेत. या दरम्यान काही चिथावणीखोर वक्तव्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही यात्रा शांततेत व्हावी यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर, मढीतील मुस्लीम व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून मढीतील यात्रा शांततेत पार पाडावी, अशी मागणी केली आहे. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला फडणवीसांचा पुन्हा ब्रेक! आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती

Pune Crime News: बिल जास्त लावलं अन् गाडीतलं पेट्रोल काढल्याचा संशय; शाब्दिक वादाच मारहाणीत रूपांतर, पिंपरीत शो रूम मॅनेजरला ग्राहकाला तुडवलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Embed widget