एक्स्प्लोर
Maharashtra Weather Update: उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; आता दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, IMD काय म्हणतंय, पाहूया...
मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Weather
1/7

फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र तापला आहे.राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे.
2/7

हवामान विभागाने सध्या उत्तरेकडील राज्यांना तीव्र पावसाचा इशारा दिलाय .त्यामुळे जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा उत्तराखंड आणि राजस्थान भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
3/7

दरम्यान पुण्याचे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी मार्च ते मे दरम्यान साधारण 10 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवलीय .
4/7

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी राज्यात बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमान नोंदवले गेले . बहुतांश ठिकाणी सर्वाधिक तापमानाचा नोंदी होत्या .
5/7

मंगळवारपासून दक्षिण कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता आहे .
6/7

4 मार्च रोजी हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे .
7/7

28 फेब्रुवारीला मुंबईत 38.4 अंश सेल्सिअस,पुण्यात 35.2°,अकोल्यात 38 डिग्री तर सांगली 36.2 अंश सेल्सिअस तापमान होते .
Published at : 01 Mar 2025 09:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
