एक्स्प्लोर
SIP : एसआयपी खात्यांच्या वाढीला ब्रेक, जानेवारीत डायरेक्ट प्लानमधील खात्यांची संख्या घटली, 10 लाखांचा आकडा समोर
SIP Investment : शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या घसरणीचा परिणाम एसआयपीच्या खात्यांवर देखील पाहायला मिळत आहे. डायरेक्ट प्लॅनमधील खात्यांची संख्या घटलीय.
डायरेक्ट प्लानमधील एसआयपी खाती घटली
1/6

जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडच्या योजनांमधील डायरेक्ट प्लॅनमधील सक्रिय एसआयपी खात्यांची संख्या 10 लाखांनी घटली आहे. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम असल्याचं मानलं जातंय.
2/6

डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूकदार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन गुंतवणक करतात. रेग्युलर प्लॅनमध्ये एजंट किंवा बँकांच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. ज्यामध्ये कमिशनचा देखील समावेश असतो.
3/6

नियमित प्लॅनच्या तुलनेत डायरेक्ट प्लॅनमधील खात्यांची संख्या वेगानं घटली आहे. डायरेक्ट प्लॅनमधील जानेवारीच्या आकडेवारीनुसार 3.92 कोटी राहिली. जी डिसेंबरच्या शेवटी 4.01 कोटी इतकी होती. म्हणजेच जवळपास 10 लाख खाती बंद झाली. दुसरीकडे रेग्युलर प्लॅनमध्ये एसआयपी खात्यांची संख्या 4 लाखांनी वाढून 6.35 कोटी रुपये झाली.
4/6

गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंड योजनांमधील अॅक्टिव्ह प्लॅनमध्ये वेगानं एसआयपी खाती उघडली जात आहेत. मात्र, बाजारातील स्थिती बदलल्यानं काही गुंतवणूकदार पोर्टफोलिओचं समीक्षण करत आहेत, असं व्हाटओक कॅपिटलचे असेट मॅनेजमेंटचे सीईओ आशिष पी. सोमैय्यांनी म्हटलं.
5/6

शेअर बाजारात गेल्या चार ते सहा महिन्यांपासून घसरण सुरु असल्यानं इक्विटी योजनांमधील गेल्या वर्षभरातील एसआयपी रिटर्न नकारात्मक झाले आहेत. म्युच्युअल फंड इंटस्ट्रीत गेल्या वर्षभरात 1 कोटी खातेदार जोडले गेले आहेत.
6/6

2024 च्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारातील तेजी आणि रेकॉर्ड संख्येनं इक्विटी फंड लाँच झाल्यानं एसआयपी खात्यांची संख्या वाढली. सुरुवातीला डायरेक्ट प्लानमधील खात्यांची संख्या वाढली होती. मात्र, नंतर रेग्युलर प्लानमधील खात्यांची संख्या वाढली. जानेवारीत एसआयपी खात्यांची संख्या 5 लाखानं घटली. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 28 Feb 2025 03:22 PM (IST)
आणखी पाहा























