एक्स्प्लोर

मोठी बातमी! शेअर मार्केटमध्ये घसरण, सेन्सेक्स 1 हजार 414 अंकांनी गडगडला 

सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स 1 हजार 414 अंकांनी गडगडला असून, निर्देशांक 73 हजार 198 वर बंद झाला आहे.

Stock Market : सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स 1 हजार 414 अंकांनी गडगडला असून, निर्देशांक 73 हजार 198 वर बंद झाला आहे. तर निफ्टी 420 अंकांनी आपटला आहे. निर्देशांक 22 हजार 125 वर बंद झाला आहे. आयटी, वित्त आणि ऑटो क्षेत्रातील समभागात मोठी घसरण झाली आहे.  

फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 4 हजार अंकांनी घसरला 

फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 4 हजार अंकांनी घसरला आहे. गुंतवणूकदारांचे जवळपास 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपमेकर एनव्हिडियाच्या घसरणीमुळं अमेरिकेतील बाजार कोसळला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करावरील ताज्या टिप्पण्यांनंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बिटकॉइनमध्ये देखील गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. 6 टक्क्यांनी कोसळत 79 हजार 214 डॉलरपर्यंत खाली घसरला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार घसरण

भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) वाढीचा वेग देखील मंदावला आहे. गेल्या सात तिमाहींपासून जीडीपीचा विकास दर अपेक्षेप्रमाणं दिसत नाही. भारतीय शेअर बाजार सातत्यानं कोसळत आहे. बाजारातील अस्थिर स्थितीचा विचार करता म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांकडून एसआयपी (Mutual Fund SIP) बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सेन्सेक्स घसरण्याची कारणं काय? 

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचं सत्र जोरदार सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या तेल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकेत रोजगाराच्या मजबूत आकडेवारीमुळं व्याजदरातील कपातीची शक्यता कमी झाली आहे. यामुळं डॉलर मजबूत झाला असून त्याच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. जीडीपीच्या दरातील कमतरता आणि कमाई कमी झाल्यानं बाजारावर परिणाम झाला. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न राहण्याचा अंदाज यामुळं शेअर बजारात घसरण सुरु आहे. शेअर बाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीसह स्मॉल कॅप, मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. यामुळं छोट्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. डॉलर मजबूत होणं, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी त्यांचा पैसा भारतीय बाजारातून विक्री करुन काढून घेणं, डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्थिक धोरण याचा प्रभाव बाजाराच्या घसरणीमागं असल्याचं सांगण्यात येत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आणखी घसरण होईल, असं सांगण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget