Santosh Deshmukh Murder: धनुभाऊंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच संतोष देशमुखांचा हत्येचा सूत्रधार; आरोपपत्रावर मंत्री पंकजाताई काय म्हणाल्या?
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मला माहिती नाही असं म्हणाल्या..

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सुद्धा सीआयडीला मिळाला आहे. या प्रकरणाचा प्रमुख साक्षीदार वाल्मिक कराड असल्याचे आरोपत्रातून समोर आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या मीडीयाशी बोलत असताना या प्रकरणी मला माहिती नाही असं म्हणाल्या, तसेच जेव्हा माहिती होईल त्यावेळी बोलेन, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.
'माझ्याकडे गृह खातं नाही'
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, या प्रकरणी दोषारोपपत्रात काय लिहिलं आहे ते मला माहिती नाही, हे सगळं गृह खात्याकडे असतं त्यांना माहिती असेल. माझ्याकडे गृहखातं नाही. आता मी पुण्यात आहे तर पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यातील स्वारगेट मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी त्या म्हणाल्या, त्या मुलीवर बलात्कार झाला. नांदेड मध्ये काल प्रकार घडला, संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत"
देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, देशमुख हत्येविषयी मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे, आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे. माझ्याकडे गृह खातं नाही, याची CID कोर्टात माहिती देईल. आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांनी शब्द दिल्यानंतर मी बोलणे चुकीचे असल्याचंही मुंड म्हणाल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत नक्की कारवाई होईल
साक्षीदारांच्या जबाबानुसार सर्व पुरावे गोळा
संतोष देशमुख हत्या प्रखरणात आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या आरोप पत्रात स्पष्ट केलं आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे, खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर वाल्मिक कराडच्या विरोधातील सर्व पुरावे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला आहे
हेही वाचा>
Santosh Deshmukh Case: पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब अन् वाल्मिक कराडच्या टोळीचा पर्दाफाश; संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे























