एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 Ind vs Pak: खणखणीत कामगिरी, दणदणीत विजय

विराट कोहली १११ चेंडूंमध्ये १००. भारताचा सहा विकेट्स आणि ४५ चेंडू राखत विजय साजरा. दुबईच्या मैदानात रिझवानच्या पाकिस्तानचा रोहितसेनेने धुव्वा उडवला. २४२ चं माफक लक्ष्य आपण सहज गाठलं. एका शतकी भागीदारीनंतर पाकिस्तान त्या पायावर मोठ्या स्कोअरचा कळस रचू शकला नाही. आपल्या गोलंदाजांनी त्यांच्या वाटेत सुरुंग पेरले आणि त्यांच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या. टॉसचं दान पाकच्या पारड्यात पडलं. तो फायदा त्यांना घेता आला नाही. आपल्या प्रत्येक गोलंदाजाने खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजी केली. खास करुन मिडल ओव्हर्समध्ये फिरकी गोलंदाजांनी जो ब्रेक लावला, त्याने पाकला मोठ्या स्कोअरचा हायवे गाठताच आला नाही. रिझवान-सौदच्या भागीदारीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फ्लॉप ठरले.

३० षटकांत दोन बाद १२९ ची धावसंख्या गाठलेल्या पाकला पुढच्या २० षटकांमध्ये केवळ ११२ धावाच करता आल्या. आपलं आक्रमण आता बॅलन्स वाटतंय. तिसऱ्या सीमरचा रोल हार्दिक पंड्या उत्तम पार पाडतोय. किंबहुना त्यानेच बाबर आणि शकीलच्या महत्त्वाच्या विकेट्स काढत पाकला वेसण घातली. २४१ चं आव्हान गाठताना भारताने १० षटकांत एक बाद ६४ असा वेगवान टेकऑफ घेतला. थोडे फटाके वाजवून रोहित आऊट झाला. मग गिल-विराट आणि विराट-श्रेयस या दोन भागीदाऱ्यांनी पाकिस्तानचे मनसुबे चिरडून टाकले. कोहलीची इनिंग म्हणजे एखादी उत्तम इमारत बांधण्यासारखं प्रात्यक्षिक होतं. पायाभरणी, मजले उभारणी आणि शानदार कळस. १११ चेंडूंमध्ये नाबाद १००. त्यात फक्त सात चौकार. तरीही स्ट्राईक रेट ९० चा. मोठे फटके खेळण्याचा मोह त्याने टाळला. त्याऐवजी ४६ एकेरी, १३ दुहेरी धावा तो जिवाच्या आकांताने धावला. म्हणजेच या खेळीमधल्या तब्बल ७२ धावा त्याने पळून काढल्यात. सामना संपल्यानंतर त्याने प्रेझेंटेशनमध्ये सांगितलंही, 'मला मधल्या ओव्हर्समध्ये गेम कंट्रोल करायचा होता'.

सामन्यावर असाच कंट्रोल विराट वनडे २०२३ वर्ल्डकपमध्येही करत होता. तसाच स्वप्नवत फॉर्म जर त्याने इथेही पकडला तर, समोरच्या टीमची काही धडगत नाही. या मॅचमध्ये त्याने १४ हजार धावा आणि ५१ वं वनडे शतक असे नवे माईलस्टोनही गाठले. श्रेयस अय्यरने धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. गिलही उत्तम लयीमध्ये होता. त्याने मारलेले काही खास ड्राईव्हज त्याच्या क्लासचं दर्शन घडवत होते. स्पर्धेत विजयाच्या दोन पायऱ्या चढल्यानंतर तिसरी पायरी थोडी आव्हानात्मक आहे. व्यावसायिक वृत्तीने खेळणारे किवी आता समोर असतील. अर्थात सेमी फायनलचं तिकीट जवळपास पक्कं असल्याने आपल्याला फार टेन्शन नाहीये. तरीही येणाऱ्या नॉकआऊट मॅचेसचा विचार करता आपण मोमेंटम कायम राखायलाच हवं. पाकवरील विजयाचा आनंद सेलिब्रेट करताना रोहितसेनेचं लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवरच असणार हे निश्चित. त्याकरता त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.

संबंधित बातमी:

Virat Kohli-Rohit Sharma: भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget