एक्स्प्लोर
राज ठाकरेंनी वाचली 'कोण तू रे कोण तू?', विकी कौशल म्हणाला, मोडून पडला संसार तरी..., मनसेचा मराठी भाषा दिन साजरा
MNS Marathi Bhasha Din : राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आशा भोसले, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे, अशोक सराफ, रितेश देशमुख, विकी कौशल यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.
राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आशा भोसले, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे, अशोक सराफ, रितेश देशमुख, विकी कौशल यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.
1/9

दरवर्षी प्रमाणे राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मनसेचा मराठी भाषा दिन मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदवला.
2/9

या कार्यक्रमाचे उद्धाटन गायिका आशा भोसले, संगीतकार आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झालं
3/9

मनसेच्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्र ही खास आकर्षण ठरली. रितेश देशमुख, अशोक सराफ यांच्यासह चित्रपटसु्ष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
4/9

जावेद अख्तर यांनी मराठी साहित्याच्या इतिहासाचा गौरव केला. ज्यांची भाषा वेगळी आहे अशा लोकांपर्यंत मराठी भाषा पोहोचली पाहिजे असं ते म्हणाले.
5/9

यावेळी राज ठाकरे यांनी 'कोण तू रे कोण तू?' या कवितेचं वाचन केलं.
6/9

आशा भोसले यांनी मराठी भाषा, साहित्याचे महत्त्व सांगत 'केव्हा तरी पहाटे' हे गीत गायले.
7/9

छावा चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या विकी कौशलनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मराठीतून भाषण केलं.
8/9

विकी कौशल याने कुसुमाग्रज यांची कणा या कवितेचं वाचन केलं.
9/9

सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी वेगवेगळ्या कवितांचे वाचन केलं.
Published at : 27 Feb 2025 10:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























