एक्स्प्लोर
Pune Crime News: बिल जास्त लावलं अन् गाडीतलं पेट्रोल काढल्याचा संशय; शाब्दिक वादाच मारहाणीत रूपांतर, पिंपरीत शो रूम मॅनेजरला ग्राहकाला तुडवलं
Pune Crime News: आरोपी प्रशांत घाडगेची गाडी त्याच्याकडे सर्व्हिसिंग ला टाकली होती. बिल जास्त लावले आणि गाडीतील पेट्रोल काढून घेतल्याच्या संशयावरून झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर मारहाणीत झालं.
Pune Crime News
1/5

पिंपरीत शो रूम मॅनेजरला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे
2/5

शेखर भरत जाधव असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या प्रशांत घाडगे वर मारहाण प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3/5

शेखर हे सुझुकी कंपनीत मॅनेजर आहेत. आरोपी प्रशांत घाडगेची गाडी त्याच्याकडे सर्व्हिसिंगला टाकली होती.
4/5

बिल जास्त लावले आणि गाडीतील पेट्रोल काढून घेतल्याच्या संशयावरून झालेल्या शाब्दिक वादाच रूपांतर मारहाणीत झालं आणि त्यांनी मॅनेजरला मारहाण केली.
5/5

आरोपी प्रशांत घाडगे ने मित्रांना बोलवून शेखर जाधव यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली, या घटनेचं सीसीटीव्हीत समोर आला आहे.प्रशांत घाडगे वर मारहाण प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 01 Mar 2025 11:21 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























