Afghanistan Semifinal Equation : इंग्लंडच्या विजयासाठी अफगाणिस्तानचं देव पाण्यात! सेमीफायनलचे समीकरण झालं रंजक, टीम इंडिया सोबत कोण खेळणार?
Afghanistan Semifinal Equation Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. आता गट टप्प्यात फक्त 2 सामने बाकी आहेत आणि उपांत्य फेरीसाठी 1 जागा अजूनही आहे.

Champions Trophy Afghanistan Semifinal Scenario : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. आता गट टप्प्यात फक्त 2 सामने बाकी आहेत आणि उपांत्य फेरीसाठी 1 जागा अजूनही आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ अ गटातून पात्र ठरले आहेत. त्याच वेळी, गट ब मध्ये खूप चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेलेला ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा होता. पण पावसामुळे संपूर्ण खेळ खराब झाला, ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. यासह, दोन्ही संघांमध्ये 1-1 गुण देण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाने 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण, अफगाणिस्तान अजूनही स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
इंग्लंडच्या विजयासाठी अफगाणिस्तानचं देव पाण्यात!
खरं तर, जर आपण ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलबद्दल बोललो तर, ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांत 4 गुणांसह पात्रता मिळवली आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका 2 सामन्यांत 3 गुणांसह आणि 2.140 च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान 3 सामन्यांतून 3 गुणांसह आणि -0.990 च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आता या गटात फक्त एकच सामना शिल्लक आहे, जो इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये खेळला जाईल. इंग्लंड आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, परंतु त्यांचा चमत्कारिक विजय अफगाणिस्तानचे नशीब बदलू शकतो.
खरं तर, जर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले, तर नेट रन रेटच्या आधारे अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. पण हे चमत्कारापेक्षा कमी नसेल. जर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली तर इंग्लंडला 11.1 षटकांत लक्ष्य गाठावे लागेल तरच दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट अफगाणिस्तानच्या खाली जाईल. किंवा जर इंग्लंड प्रथम खेळला तर त्यांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. उदाहरणार्थ, जर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा केल्या, तर त्यांना 207 धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागेल, तरच अफगाणिस्तान संघ पात्र ठरू शकेल, जे जवळजवळ अशक्य वाटते.
अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले
अफगाणिस्तानमुळेच इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. खरंतर, स्पर्धेतील आठवा सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आवश्यक होते. पण अफगाणिस्तानने हा सामना 8 धावांनी जिंकला. आता, या स्पर्धेत अफगाणिस्तान इंग्लंडवर अवलंबून आहे. जर इंग्लंडने काही चमत्कार केला तर अफगाणिस्तानचे नशीब बदलू शकते.
टीम इंडिया सोबत कोण खेळणार?
जर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध हरला, तर ग्रुप अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असले, ते ग्रुप अ मधील अव्वल संघाविरुद्ध खेळेल. जर दक्षिण आफ्रिका इंग्लंडविरुद्ध हरली आणि तरी उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. कारण अफगाणिस्तान संघा पेक्षा त्यांचा नेट रन रेट खराब आहे. जर इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका जिंकला तर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.





















