गोविंदा अन् सुनीता अहुजा घेणार 'ग्रे डिवोर्स'? आयुष्यातील बराच काळ एकत्र घालवल्यानंतर वेगळं होण्याचा ट्रेंड का वाढतोय?
What is Gray Divorce: गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींचे घटस्फोट चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच, वयाची पन्नाशी ओलांडलेली जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेत आहेत, असं का होतंय?

What is Gray Divorce: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Auja) सध्या चर्चेत आहे. लग्नानंतर 37 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघेही घटस्फोट (Divorce) घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात (Married Life) सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, दोघांच्या घटस्फोटासाठी गोविंदाचं 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबतचं एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर (Extramarital Affair) कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि सुनीता अहुजा एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. सुनीतानं अलिकडेच गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल अनेकदा संकेत दिले आहेत. सध्या दोघेही एकत्र राहत नाहीत. याचं स्पष्टीकरण देताना दोघे पती-पत्नी दोघांचीही दिनचर्या वेगवेगळी असल्याचं सांगतात. म्हणूनच दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींचे घटस्फोट चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच, वयाची पन्नाशी ओलांडलेली जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेत आहेत, असं का होतंय? लग्नाच्या बऱ्याच वर्षांच्या सुखी संसारानंतर आपलं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा विचार अनेकजण करत आहेत, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून 'ग्रे डिवोर्स' (Gray Divorce) हा शब्द फारच ऐकायला मिळत आहे... 'ग्रे डिवोर्स' म्हणजे नेमकं काय? 'ग्रे डिवोर्स' म्हणजे, सुखी संसाराची अनेक वर्ष एकमेकांसोबत घालवल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेतात. गोविंदा आणि सुनीता आहुजा दोघेही सध्या 'ग्रे डिवोर्स'मुळे चर्चेत आहेत.
गोविंदा आणि सुनीता अहुजा 'ग्रे डिवोर्स' घेणारं पहिलं हाय प्रोफाईल जोडपं नाही. दोघांच्या आधी प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान, अभिनेता आमिर खान आणि टेनिसपटू सानिया मिर्झा हेदेखील 'ग्रे डिवोर्स'मुळे चर्चेत होते.
हे असं का होतं?
'ग्रे डिवोर्स' म्हणजे नेमकं काय? सध्या हा ट्रेंड का वाढतोय? 'ग्रे डिवोर्स' म्हणजे, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमधील घटस्फोट किंवा वेगळं होणं. अनेकदा ही परिस्थिती आयुष्याचा सर्वाधिक काळ एकत्र राहिल्यावर उद्भवते. काही प्रकरणांमध्ये जोडपी कायदेशीररित्या घटस्फोट घेत नाहीत, तर फक्त वेगळं राहण्याचा पर्याय निवडतात. मग ते त्यांच्या घरात राहत असोत किंवा त्यांच्या मुलांसोबत. 'ग्रे डिवोर्स'चं एक मुख्य कारण म्हणजे, मागील पिढ्यांचं वैवाहिक नातं भावनिक गोष्टींपेक्षाही वचनबद्धता आणि जबाबदारीवर आधारित होतं. काळानुसार, लोक जसजसे मोठे होतात, तसतसं त्यांना जाणवतं की, त्यांच्या नात्यात आता उब उरलेली नाही.
एम्पटी नेस्ट सिंड्रोम
HT.com च्या एका रिपोर्टनुसार, ग्रे डिव्होर्समागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. बहुतेक जोडपी एका सामान्य उद्देशासाठी एकत्र राहतात आणि त्यांच्या मुलांचे संगोपन करतात. जेव्हा त्यांची मुलं मोठी होतात आणि घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना कळतं की, त्यांच्यात फार कमी साम्य आहे. आता त्यांच्यात कोणतंही समान ध्येय नाही. ज्यामुळे वेगळेपणाची परिस्थिती निर्माण होते. नातेसंबंधांमध्ये बेवफाई किंवा प्रामाणिक नसणं हे देखील एक मोठं कारण आहे. कारण जे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नाहीत, ते बाहेर भावनिक आणि शारीरिक समाधान शोधतात. या नात्यांमुळे पती-पत्नीमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























