HSRP Number Plate : राज्यात एचएसआरपी नंबर प्लेटचा वाद, तिप्पट वसुलीचा आरोप
High Security Registration Plate : सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचे कंत्राट देण्यात आल आहे. मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे . या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने आणि कधी कंत्राट देण्यात आले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला.
कोणत्या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे?
- रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि. Rosmerta Safety systems LTD
- रीअर मेझॉन इंडिया लि. Real Mazon India LtD.
- एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. FTA HSRP solutions Pvt. LtD.
महाराष्ट्र आणि इतर राज्यात नक्की किती पैसे आकारले जाणार आहेत?
दुचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम?
- महाराष्ट्र - 450
- गुजरात - 160
- गोवा - 155
- आंध्रप्रदेश - 245
- झारखंड - 300
चारचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम?
- महाराष्ट्र - 745
- गुजरात - 460
- गोवा - 203
- झारखंड - 540
- आंध्र प्रदेश - 619
अवजड वाहनांच्या नंबरप्लेससाठी किती रक्कम?
- महाराष्ट्र - 475
- गुजरात - 480
- गुजरात -232
- झारखंड - 570
- आंध्र प्रदेश -649























