एक्स्प्लोर

Uttarakhand Avalanche : बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 47 कामगारांचा बचाव, अजूनही 8 जणांचा शोध सुरुच

Uttarakhand Avalanche : आज 14 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना जोशीमठ येथील लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे.

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात झालेल्या ग्लेशियर कोसळून झालेल्या हिमस्खलनात 55 मजूर अडकले होते. यानंतर आता 47 जणांची सुटका करण्यात आली असून 8 जणांचा शोध सुरू आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बचावकार्यासाठी  लष्कराच्या 4 हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. 7 जणांना जोशीमठ रुग्णालयात आणण्यात आले आहे. लष्कर, ITBP, BRO, SDRF आणि NDRF चे 200 हून अधिक जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. ही घटना बद्रीनाथपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चमोलीच्या माना गावात घडली. ब्रिगेडियर एमएस ढिल्लोन म्हणाले की, लष्कर काल सकाळपासून सातत्याने बचावकार्य करत आहे. रात्रभर बचावकार्य राबविण्यात आले. आज 14 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना जोशीमठ येथील लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, पीएम मोदींनी उत्तराखंडचे सीएम धामी यांच्याकडून बचाव कार्याची माहिती घेतली आहे. धामी म्हणाले की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चे एकूण 57 लोक चमोली-बद्रीनाथ महामार्गावर काम करत होते, त्यापैकी 2 लोक रजेवर होते. घटनेच्या वेळी सर्व कामगार कंटेनरच्या घरात होते. त्याचवेळी डोंगरावरून बर्फाचा मोठा भाग खाली आला आणि कामगार अडकले. 

बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 11 कामगार

हिमस्खलनात अडकलेल्या 55 मजुरांमध्ये बिहारमधील 11, उत्तर प्रदेशातील 11, उत्तराखंडमधील 11, हिमाचल प्रदेशातील 7, जम्मू-काश्मीरमधील 1 आणि पंजाबमधील 1 मजुरांचा समावेश आहे. उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या यादीत 13 मजुरांची नावे आहेत, पण त्यांचे पत्ते आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध नाहीत. उर्वरित मजुरांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू, 4 हेलिकॉप्टर तैनात

उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन म्हणाले की, चमोलीत हवामान अजूनही खराब आहे. लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 200 हून अधिक लोकांना घटनास्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे. 4 हेलिकॉप्टर कार्यरत आहेत. हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर स्टँडबायवर आहे. हवामान साफ ​​होताच ते येथे पोहोचेल. जोशीमठमध्ये हवामान निरभ्र होत आहे. आम्ही मानाजवळ हेलिपॅड बनवत आहोत, कारण आमचे हेलिपॅड बर्फाने झाकलेले आहे. सतत बर्फवृष्टी होत असल्याने रात्री बचावकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी पुन्हा कारवाई सुरू झाली. आमची वैद्यकीय टीम जोशीमठमध्ये तयार आहे. मुख्यमंत्री आज घटनास्थळी जाणार आहेत.

4 जणांची प्रकृती गंभीर

शुक्रवारी सुटका करण्यात आलेल्या सर्व मजुरांना माना गावातील आयटीबीपी कॅम्पमध्ये आणण्यात आले आहे. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताबाबत एसडीआरएफ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री, लष्कर, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांशी या घटनेबाबत चर्चा केली.

गुदमरल्यासारखे आणि हायपोथर्मिया फ्रॅक्चरची शक्यता

बर्फात गाडलेले कामगार किती दिवस जिवंत राहणार हा मोठा प्रश्न आहे. चीफ कन्सल्टंट सर्जन राजीव शर्मा यांनी सांगितले की, बर्फात गाडल्यामुळे गुदमरून मृत्यू होतो. हायपोथर्मिया फ्रॅक्चरमुळे मृत्यू देखील होतो. जास्त काळ बर्फात गाडले गेल्याने मृत्यू होऊ शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
Nashik News : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
Jalore Viral Constable : असा पोलिस होणे नाहीच! हायवेवर धावत्या कारमध्येच हैदोस; व्हिडिओ समोर येताच संतापलेल्या एसपींची मोठी कारवाई
Video : असा पोलिस होणे नाहीच! हायवेवर धावत्या कारमध्येच हैदोस; व्हिडिओ समोर येताच संतापलेल्या एसपींची मोठी कारवाई
Myanmar Thailand Earthquake : म्यानमार भूकंपातील आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती; थायलंडसह चार देशात धक्क्यांवर धक्के
म्यानमार भूकंपातील आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती; थायलंडसह चार देशात धक्क्यांवर धक्के
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 29 March 2025Prashant Koratkar Rolls Royce : प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस कार तुषार कलाटेंच्या फॉर्महाऊसवर कशी?ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 29 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
Nashik News : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
Jalore Viral Constable : असा पोलिस होणे नाहीच! हायवेवर धावत्या कारमध्येच हैदोस; व्हिडिओ समोर येताच संतापलेल्या एसपींची मोठी कारवाई
Video : असा पोलिस होणे नाहीच! हायवेवर धावत्या कारमध्येच हैदोस; व्हिडिओ समोर येताच संतापलेल्या एसपींची मोठी कारवाई
Myanmar Thailand Earthquake : म्यानमार भूकंपातील आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती; थायलंडसह चार देशात धक्क्यांवर धक्के
म्यानमार भूकंपातील आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती; थायलंडसह चार देशात धक्क्यांवर धक्के
Manoj Jarange Patil : बीडमध्ये भाषण सुरु असतानाच अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमध्ये भाषण सुरु असतानाच अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
मास्तरीण बाईच्या प्रेमात एकाचवेळी मास्तर आणि मुख्याध्यापकाचा 'जीव झाला येडापीसा'; मास्तर सांगून ऐकत नसल्याने मुख्याध्यापकानं..
मास्तरीण बाईच्या प्रेमात एकाचवेळी मास्तर आणि मुख्याध्यापकाचा 'जीव झाला येडापीसा'; मास्तर सांगून ऐकत नसल्याने मुख्याध्यापकानं..
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
Embed widget