Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 March 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 March 2025 : मार्च महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या शत्रूंसाठी फार महागात पडणार आहे. या काळात जोडीदाराचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. तुमच्या कामात जोडीदाराचंही तितकंच योगदान असणार आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्चचा नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात काहीसे चढ-उतार जामवतील. तसेच, प्रेमाच्या बाबतीत देखील तुम्हाला काहीसा स्ट्रगल करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होतील. त्यामुळे मतभेद देखील पाहायला मिळतील. तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही घेतलेले अनेक निर्णय यशस्वी ठरतील. लोक तुमच्या कामाचं चौफेर कौतुक करतील. तसेच, आर्थिक परिस्थितीने तुम्ही समृद्ध असाल. गरजूंना दान करण्याची वृत्ती जागृत होईल. एकंदरीतच नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घ्या.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात जर तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. या आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांबरोबर देखील फिरायला जाण्याचा योग जुळून येणार आहे. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद टिकून राहील. भौतिक सुख-सुविधांचा आनंद घ्याल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. उच्च अधिकाऱ्यांचा तुमच्या कामावर पाठिंबा मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मध्यम फलदायी असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला ना तोटा ना लाभ मिळणार आहे. तसेच, आर्थिक स्थिती देखील सामान्य असेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी चांगला असणार आहे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर असणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीत थोडीफार सुधारणा दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















