एक्स्प्लोर
Shani Shingnapur Temple : शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच होणार अभिषेक, नेमकं कारण काय? पाहा PHOTOS
Shani Shingnapur Temple : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाची आजपासून (दि. 01) अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Shani Shingnapur Temple
1/9

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून (दि. 01) ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे.
2/9

भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत ने हा निर्णय घेतला होता.
3/9

त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
4/9

अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करतात.
5/9

अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार काही तेलांमध्ये भेसळ आढळल्याने शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे.
6/9

त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय.
7/9

शनिशिंगणापूर मंदिराच्या प्रवेश द्वारावरच भक्तांकडील तेलाच्या बाटल्या तपासल्या जात आहेत.
8/9

ब्रँडेड तेलाच्या निकषामध्ये हे तेल खाद्य तेल असलं पाहिजे, शुद्ध शाकाहारी तेल असावं, मुदत बाह्य तेल नसावे असे निकष लावण्यात आले आहेत.
9/9

नियमात न बसणारे तेल आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर करावाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.
Published at : 01 Mar 2025 02:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















