Sunil Shetty: 'पोलिसांनी मला बंदूक रोखत गुडघे टेकायला लावले..' अभिनेता सुनिल शेट्टीनं 9/11 हल्ल्यानंरचा 'तो' भयानक अनुभव सांगितला, म्हणाला..
मला बंदुकीच्या धाकावर ठेवण्यात आले, बेड्यांमध्ये बांधण्यात आले आणि...', सुनील शेट्टी ९/११ नंतरच्या भयानक घटनेचे वर्णन करतात

Sunil Shetty: बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी कायमच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो .आता या दमदार अभिनेत्याची एक मुलाखत चांगलीच गाजतेय. बॉलीवूडचा दमदार अभिनेता सुनील शेट्टीने एक धक्कादायक अनुभव नुकताच शेअर केलाय . 9 / 11 चा हल्ल्यानंतर अमेरिकेत पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर सुनील शेट्टीला बेड्या घातल्या होत्या असं त्यानं सांगितलंय .यामागचं खरं कारण काय होतं हे त्यांना या मुलाखतीत उघड केलं . खरंतर मुलाखतीत जेव्हा सुनील शेट्टीला विचारण्यात आलं की चित्रपटसृष्टीतील लोक अशा कोणत्या घटनेचे बळी पडले आहेत का ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल ? यात सुनील शेट्टीने त्या भयानक दृश्याशी संबंधित एक अनुभव सांगत सर्वांनाच हादरवून टाकले .
अमेरिकेत 9/11 नंतर झालेल्या हल्ल्याच्या अगदी आधी तो अमेरिकेत कसा पोहोचला आणि त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं हे सुनील शेट्टीने सांगितलं . कांटे या चित्रपटाचा शूटिंग करत असताना अभिनेता सुनील शेट्टीला एका छोट्या गैरसमजातून पोलिसांसमोर गुडघे टेकावे लागले बंदुकीच्या धाकावर त्याला हातकडेही लावण्यात आल्याचा त्यांना सांगितलं . (9/11 Attack)
चाव्यांवरून झाला गैरसमज , गुडघे टेकावे लागले :सुनील शेट्टी
सुनील शेट्टी म्हणाला मला दाढी असल्याने बंदुकीच्या धाकावर गुडघे टेकायला लावले गेले .आम्ही काही दिवस शूटिंग केले आणि नंतर हॉटेलमध्ये गेलो .मी लिफ्ट मध्ये होतो आणि माझ्या चाव्या विसरलो .त्या लिफ्टमध्ये एक अमेरिकन होता जो माझ्याकडे पहात राहिला .आणि मी त्याला विचारले की तुमच्याकडे चाव्या आहेत का ?मी चाव्या विसरलो आहे आणि माझे सहकारीही बाहेर गेले आहेत .असं विचारलं ना तो धावत गेला आणि त्याने बाहेर जाऊन गोंधळ घातला .पोलीस बंदुका घेऊन आले आणि मला म्हणाले गुडघ्यावर बसा नाहीतर गोळी घातली जाईल . (Sunil Shetty)
मला धक्का बसला . मी गुडघे टेकले होते .मला काय चाललंय तेही कळत नव्हतं त्यामुळे मला गुडघ्यावर बसावं लाग .त्यांनी मला हातकडी लावली .हा सगळा प्रकार प्रोडक्शन टीमला कळल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये येऊन हस्तक्षेप केला .हॉटेलच्या व्यवस्थापकांपैकी एक पाकिस्तानी होता .त्याने मध्यस्थी करत हा अभिनेता असल्याचा सांगितलं .सुनील शेट्टी ने सांगितलं की चावीसाठी इशारा केल्यामुळे समोरच्या माणसाचा गैरसमज झाला .कदाचित त्या माणसाला इंग्रजी येत नव्हते म्हणून त्याला ती भाषा ही समजत नव्हती .
हेही वाचा:
Oscar 2025 : भारतात ऑस्कर पुरस्कार 2025 कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर























