Sunita Ahuja Viral Video: "कोई माई का लाल अलग नहीं कर सकता..."; गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनीता अहुजाचा Video व्हायरल
Sunita Ahuja Viral Video: गोविंदानं मार्च 1987 मध्ये सुनीतासोबत लग्न केलं होतं. 37 वर्षांच्या सुखी संसारानंतर आता हे जोडपं काडीमोड घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Sunita Ahuja Viral Video: बॉलिवूड स्टार गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता (Sunita Ahuja) हिच्यापासून घटस्फोट (Divorce) घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, सुनीतानं 6 महिन्यांपूर्वी अभिनेत्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. पण, आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. दरम्यान, सुनीताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणते की, तिला आणि गोविंदाला कोणीही वेगळं करू शकत नाही.
सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांनी काही काळापूर्वी हिंदी रशला मुलाखत दिली होती. यामध्ये तिनं सांगितलं होतं की, तो आणि गोविंदा वेगवेगळ्या घरात राहतात. एका मुलाखतीत सुनीता म्हणाली की, गेल्या 12 वर्षांपासून ती एकटीच तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तेव्हापासून तिच्या आणि गोविंदाच्या नात्यातील काही गोष्टी ठीक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुनीता गोविंदापासून वेगळं राहण्याचं खरं कारण सांगताना दिसत आहे.
"किसी माई का लाल..." : सुनीता अहुजा
व्हिडीओमध्ये सुनीता म्हणते की, "आम्ही वेगवेगळे राहतो म्हणजे, जेव्हा त्यांनी पॉलिटिक्स जॉईन केलं होतं, त्यावेळी माझी मुलगी ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर होती. त्यावेळी सगळे कार्यकर्ते यांच्याकडे काहीना काही कामानिमित्त सारखे घरी यायचे. आता माझी मुलगी आहे, मी आहे... आम्ही दोघीही शॉर्ट्स घालून घरात फिरायचो. म्हणून आम्ही घरासमोर ऑफिस घेतलं होतं. मला आणि गोविंदाला या जगात कोणीच वेगळं करु शकत नाही... कौन माई का लाल है, सामने तो आए..."
37 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड?
गोविंदानं मार्च 1987 मध्ये सुनीतासोबत लग्न केलं होतं. 1988 मध्ये, या जोडप्यानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव टीना ठेवलं. त्यांना यशवर्धन नावाचा एक मुलगा देखील आहे. सुनीता अनेकदा गोविंदा आणि मुलांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























