Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोप पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेले आहे. या आरोप पत्रात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. यात देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे तर आरोपी क्रमांक दोन म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख आहे.
या प्रकरणात ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. सीआयडी याचा तपास करत असताना सीआयडी ते लक्षात आलं की, हे तिने गुन्हे वेगळे नसून एकत्रितच आहेत. त्यामुळे तिन्ही गुन्हे एकत्रित करून आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. यात खंडणीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.
जो आपल्या आड येईल त्याला सोडायचं नाही
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे की, सहा तारखेला संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यात आवादा कंपनीच्या प्रांगणात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तर सात तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले की, जो उठेल आणि आपल्या आड येईल त्याला कोणालाही सोडायचं नाही. यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत फोन करून धमकी दिली होती.
संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा
आठ तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एक गोपनीय साक्षीदार त्यांच्या सोबत असताना विष्णू चाटेने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला आहे. नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेल येथे ही भेट झाली होती. त्या ठिकाणी एक साक्षीदार होता. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना द्या, असाही उल्लेख आरोप पत्रात नमूद करण्यात आला आहे.
आणखी वाचा























