एक्स्प्लोर
Advertisement

Onam Photo : केरळच्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य असलेला 'ओनम'

ओनम
1/7

केरळवासियांसाठी महत्वाचा सण म्हणजे ओनम. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओनम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात असते.
2/7

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. बळीराजाच्या आगमनानिमित्त आज त्याच्या स्वागतासाठी ओनमचा सण साजरा करण्यात येतो.
3/7

दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. या वर्षी हा सण 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
4/7

आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात.
5/7

पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हे ओनमचे खास आकर्षण असते. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते.
6/7

ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते.
7/7

पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं.
Published at : 21 Aug 2021 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
