एक्स्प्लोर

Somnath Suryavanshi Death: मोठी बातमी : सोमनाथ सूर्यवंशींना अटक का झाली, जेलमध्ये काय झालं, कोर्टात काय घडलं, PM रिपोर्टमध्ये नेमकं काय? मुख्यमंत्र्यांनी A टू Z सांगितलं!

Devendra Fadnavis in Vidhansabha: पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी अतिरिक्त बळाचा वापार केला. त्यांची चौकशी केली जाईल, त्यांना निलंबित केले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर: परभणी हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झालेला नाही. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत अचानक जळजळ सुरु झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते शुक्रवारी विधानसभेत बीड-परभणी प्रकरणावरील चर्चेवेळी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपशील सभागृहात मांडला. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे आंदोलक होते. ते कायद्याचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूरचे होते, त्यांचे कुटुंब आहे, ते पुण्यातही राहायला होते. सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीत शिक्षण घेत होते. त्यांच्यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, परभणीत जी जाळपोळ सुरु होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी यांना दोनवेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले.  त्यांच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिगरी मारहाण केली का, तुम्हाला मारहाण झाली का? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही. पोस्टमार्टेम अहवालाचे पहिले पान सगळ्यांनी वाचले असेल. पण सूर्यवंशीच्या वैद्यकीय तपासणीत लिहले आहे की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता.  वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणार: देवेंद्र फडणवीस

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका तयार झाल्या आहेत. ते आरोपी असले तरी गरीब होते आणि वडार समाजाचे होते. पैशांनी जीव परत येत नाही. पण राज्य सरकार सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करेल. या प्रकरणात उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. या सगळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आणखी वाचा

PI अशोक घोरबांड यांना सस्पेंड करुन चौकशी करणार, परभणी राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget