एक्स्प्लोर
Allu Arjun Arrested : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कारवाई, नेमकं प्रकरण काय?
Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलिजपूर्वी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली,यात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली.

Allu Arjun Arrested
1/14

'पुष्पा 2' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, सुपरस्टार अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
2/14

हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.
3/14

4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अल्लु अर्जुन थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
4/14

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
5/14

अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेलं. या प्रकरणासंदर्भात अभिनेत्याची येथे चौकशी केली जाणार आहे.
6/14

अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
7/14

अभिनेता अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं.
8/14

या घटनेत महिलेचा मृत्यू झाला हे दु:खद असल्याचं अभिनेता म्हणाला.
9/14

चित्रपटाच्या रिलिजवेळी चित्रपटगृहात येणं साहजिक आहे, असं अल्लू अर्जुन म्हणाला.
10/14

याआधीही आपण अनेकदा चित्रपटगृहात आलो आहे, मात्र अशा घटना कधी घडल्या नसल्याचं त्याने म्हटलं.
11/14

थिएटरजवळ पोहोचण्याआधी आपण थिएटर मॅनेजमेंट आणि ACP ला कळवल्याचं अभिनेता म्हणतो.
12/14

मी थिएटरमध्ये पोहोचण्यावेळी कोणताही निष्काळजीपणा केला नाही, असं अभिनेत्याचं म्हणणं आहे.
13/14

माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, असं अल्लु अर्जुन म्हणाला.
14/14

आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटकेसह तपास प्रक्रियेला स्थगिती देण्याचे अंतरिम आदेश जारी करण्यात यावेत, अशी विनंती त्याने केली.
Published at : 13 Dec 2024 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion