Jitendra Awhad : बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
Jitendra Awhad on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बीड आणि परभणीच्या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
Jitendra Awhad on Devendra Fadnvis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत परभणी राडा (Parbhani Violence) आणि बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Beed Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणावरून विधानसभेत भाष्य केले. बीड हत्ये प्रकरणात पोलिसांचीही कुचराई दिसत असल्याचं सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची घोषणा त्यांनी केली. तर देशमुख यांच्या हत्येत दोषी आढळल्यास वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले. तर परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू बाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता या दोन्ही प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतले का? जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसे आले असते ना? मल्टीपल इंज्युरी झाल्या कश्या आणि कुठे? सूर्यवंशींचा मृत्यू कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने निवेदन दिले नाही. पोलिसांनी रस्त्यावर ज्या प्रकारे आंदोलकांना मारले त्याचे व्हिडिओज आहेत. पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचा काम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केले. पण बारा कोटी लोकांना हे अपेक्षित होते ते न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही. आजही त्या व्यक्तीवर आणि परभणीकरांवर अन्याय झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिलेला नाही.
वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम करताय का?
बीड प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बीडमध्ये शेवटपर्यंत कळले नाही की, वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होणार आहे. तो 302 चा आरोपी होणार आहे की नाही? त्याला मोक्का लागणार आहे की नाही? वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करतेय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करत आहात. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही, मुख्यमंत्र्यांना असे म्हणायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वाल्मिक कराड सिरीयल किलर
ते पुढे म्हणाले की, वाल्मिक कराड हा सिरीयल किलर आहे, तो विकृत आहे. तुम्ही म्हणता मी कोणालाही मोकळं सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं. तुम्ही सांगितलं का, आम्ही त्याला 302 चा आरोपी करणार आहोत. ज्या खंडणीतूनही हत्या झाली ती खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. जर वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचे काम कशासाठी करत आहात? असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
आणखी वाचा