एक्स्प्लोर
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Maharashtra CM Oath Ceremony महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला, या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती, त्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर हेही हजर होते

Narendra modi in swearing ceremony of Devendra Fadnavis
1/12

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला, या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती, त्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर हेही हजर होते
2/12

सचिन तेंडलुकर यांच्यासह मुकेश अंबानी, बॉलिवूड स्टार आणि नामवंत उद्योगपतीही या सोहळ्याला उपस्थित होते.
3/12

अभिनेता अर्जून कपूर आणि जान्हवी कपूर हेही उपस्थितांच्या गर्दीमध्ये व्हिआयपी पाहुण्यांच्या रांगेत शपथविधी सोहळ्याला दिसून आले.
4/12

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत वेगळाच विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
5/12

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ते भाजपचे एकमेव नेते ठरले आहेत, ज्यांनी तीनवेळा महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून शपथ घेतली
6/12

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचे विशेष अभिनंदन केले, तर फडमवीसांनीही मोदींना नम्रपणे धन्यवाद दिले
7/12

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच शपथ घेतली आहे. आता, ते महायुती सरकारमध्ये शासनाचे जबाबदार व्यक्ती आहेत
8/12

एकनाथ शिंदे यांनीही शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्यावेळी मोदींनीही त्यांचा हात हाती घेत अभिनंदन केलं
9/12

उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अजित पवारांचेही अभिनंदन करण्यात आलं
10/12

शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शेजारीच बसले होते. विशेष म्हणजे दोघेही गुलाबी जॅकेटमध्ये होते
11/12

दरम्यान, या सोहळ्याला उद्योगपती अंबानी कुटुंबीयांची देखील उपस्थिती दिसून आली.
12/12

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अंबानींसोबत हसत-खेळत संवाद साधला, त्यावेळी अनंत अंबानी हे देखील गप्पांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 05 Dec 2024 06:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion