एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांचा 4 वाजता फोन, कोम्बिंग ऑपरेशनबाबत IG सोबत कॉन्फरन्स कॉल, फडणवीसांनी सगळं सांगितलं!

Devendra Fadnavis : परभणीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचे बोलले जात होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis : परभणीतील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. बंदचे आवाहन करत असंख्य युवक रस्त्यावर आल्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात तणाव निर्माण झाला. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिल्यानतंर परिस्थिती निवळली होती. यानंतर पोलिसांकडून कोबिंग ऑपरेशन झाल्याचे म्हटले जात होते. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं की, मला माहिती आहे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना विचारलं कसलं ऑपरेशन सुरू आहे? तर पोलीस म्हणाले व्हिडिओमध्ये दिसताय त्यांना आम्ही पकडतोय. मी त्यांना सांगितलं त्याचा संदेश चांगला जात नाही. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं. सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. सहा वाजल्यानंतर कोणाला अटकही केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले हे सांगणं योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

अशोक घोरबांड यांचं निलंबन करुन चौकशी करणार

ते पुढे म्हणाले की, त्यामध्ये एक तक्रार आलेली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरपडे यांना निलंबित केला जाईल. त्यांना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी अधिक बळाचा वापर केला आहे का? याची चौकशी होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी हे आंदोलक आहेत. ते कायद्याचे शिक्षण घेत होते.  ⁠ते मुळ लातूरचे आहेत. ⁠परभणीत शिक्षण घेत होते. ⁠सुर्यवंशी यांना जाळपोळ करणार्‍यांमध्ये अटक करण्यात आली. ⁠त्यांना दोनवेळा मॅजेस्टिकच्या समोर ठेवलं. पोलिसांनी मारहाण केल्याची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यांना ⁠श्वसनाचा आजार आहे, अस मेडीकल रिपोर्टमध्ये आहे. त्यांचे ⁠एका खाद्यांचे हाड तुटल्याचे ही सांगण्यात आले. त्याना जळजळतय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यावेळी त्यांना मृत घोषित केले. 

आणखी वाचा 

संविधानाची विटंबना ते तोडफोड, जाळपोळ, फडणवीसांनी विधिमंडळात A टू Z सांगितलं, परभणीत नेमकं काय-काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget