एक्स्प्लोर
Quit India Movement : ऑगस्ट क्रांती दिन आणि भारत छोडो आंदोलनाची गोष्ट

(photos by getty images)
1/8

गांधींजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्टला 'क्रांती दिन' पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील 'ऑगस्ट क्रांती दिवस' म्हणून ओळखला जातो. (photos by getty images)
2/8

ब्रिटिशांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतुर होता. त्याच वेळी 'करो या मरो' या मंत्रासह महात्मा गांधींनी या स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी पेटवली. आयुष्यभर अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या गांधींनीच 'करो या मरो' हा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. (photos by getty images)
3/8

ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 साली 'क्रिप्स मिशन' भारतात पाठवलं. क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वराज्य नाकारुन डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला. पण भारतीयांनी हा प्रस्ताव नाकारला. (photos by getty images)
4/8

8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत ऐतिहासिक 'भारत छोडो'चा प्रस्ताव पारित करण्यात आला. देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांची एकच मागणी होती, ती म्हणजे 'पूर्ण स्वराज्य'. (photos by getty images)
5/8

गांधींच्या 'करो या मरो' या मंत्राने जनतेवर जादूई प्रभाव पाडला आणि त्यांच्यामध्ये एक नवा जोश, साहस, संकल्प, दृढनिश्चय, आत्मविश्वास संचारला. ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा 8 ऑगस्ट रोजी झाली आणि 9 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. (photos by getty images)
6/8

महत्वाचे नेते अटकेत होते आणि इतर नेते भूमिगत झाल्याने या आंदोलनाला तसं नेतृत्व राहीलं नाही. त्यामुळे लोकांनीच हे आंदोलन हाती घेऊन त्याचे नेतृत्व केल्याने हे आंदोलन 'लिडरलेड मुव्हमेंट' ठरलं.(photos by getty images)
7/8

या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. त्यामुळे ठिकाणी रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या, रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखडण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि जमशेदपूर या ठिकाणी कामगारांनी आंदोलनात भाग घेतला. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवण्यात आला.(photos by getty images)
8/8

भारत छोडो आंदोलनाचा इतिहास अज्ञात योध्यांच्या बलिदानाने भरुन गेला आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार यांच्या अनेक साहसी गोष्टी आहेत. भारत छोडो हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हतं तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतनेचा संचार होता. त्यामुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.(photos by getty images)
Published at : 09 Aug 2021 10:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
