Devendra Fadnavis On Amit Shah : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय झालं?, फडणवीसांची मोठी माहिती
Devendra Fadnavis On Amit Shah : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय झालं?, फडणवीसांची मोठी माहिती
राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झालेली आहे? त्याच्या करता ज्या संस्था आणि पायाभूत सुविधा तयार करायच्या होत्या त्याची तयारी किती झालेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत किती प्रकरणे नोंदवली गेली आहेत? महाराष्ट्राच्या वतीने आम्ही त्यांना माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. त्या संदर्भात, विशेषतः फॉरेन्सिक पायाभूत सुविधा आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करत आहोत. त्यात 27 वॅन्स आम्हाला मिळाल्या आहेत. पुढच्या सहा महिन्यामध्ये आमचे पूर्ण फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ज्यांना शिक्षा झाली आहे अशा प्रत्येक ठिकाणी फॉरेन्सिक वॅन्स जाऊन तिथेच सर्व प्रकारची पुरावे गोळा करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिली. यासोबतच, जवळपास 90% म्हणजे दोन लाखांचा आमचा दल आहे. त्यातल्या... करण्याची एक सोय करून दिलेली आहे. तशा प्रकारच्या प्रत्येक न्यायालयाचे क्यूबिकल्स तयार करून ते ऑनलाइन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे. त्याची माहिती आम्ही दिली. पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू ज्यामुळे न्यायालयातील गर्दी देखील कमी होईल आणि प्रत्येक वेळी पोलीस वॅन द्या, पोलीस एस्कॉर्ट द्या आणि जो काही त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी त्याला तुरुंगात न्या. हे सगळं तुरुंगातून न्यायालयात न्या. अशा सगळ्या गोष्टी कमी करता येतील. त्यांनी आम्हाला एक गोष्ट अजून सांगितली की विशेषतः आता जास्त तारखा मागता येणार नाहीत. या संदर्भात कायद्याने तरतूद केलेली आहे. त्यामुळे अभियोजन विभागाला तशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन कमीत कमी वेळात प्रकरण कसे निकाली काढता येईल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं अतिशय चांगली, अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातन मिळालेल आहे. हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगाने या ठिकाणी काम करू.



















