1 एप्रिल अगोदर जर तुम्ही तुमच्या गाडीची नंबर प्लेट नाही बदलली तर तुम्हाला 1 हजारपर्यंतचा भुर्दंड बसू शकतो.
2019 पूर्वीच्या वाहनांना हाई सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावणे आता बंधनकारक झाले आहे.
1 एप्रिल पासून जर तुमच्या वाहनांना HSRP नसेल तर भुर्दंड भरावा लागू शकतो.
HSRP लावल्याने वाहनधारकांची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकते.
HSRP लावण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या प्रमुख शहरात खासगी एजन्सींना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.
HSRP मध्ये हॅलो ग्राम स्टिकर्ससह नंबर प्लेट येणार.
त्या नंबर प्लेटवर इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असेल आणि हा नंबर मशीनद्वारे लिहिला जाईल.
HSRP वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि कोणीही त्याची कॉपी करू शकत नाही.
गाडीचा अपघात झाला तर गाडीला लावलेली HSRP वाहनाची सर्व माहिती देते. ही नंबर प्लेट अधिकृत सेंटरवरूनच बसवावी.