एक्स्प्लोर
Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?
Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने अन् चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. सोन्याच्या दरातील वाढीमुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
आजचा सोन्याचा दर
1/6

सोने दरात आज देखील वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 341 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 86089 रुपये इतका आहे. तर, चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.
2/6

चांदीच्या दरात 1945 रुपयांची वाढ होऊन एक किलो चांदी 97494 रुपयांवर पोहोचली आहे. हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केले आहेत. या दरांमध्ये जीएसटी शुल्कासह या दरामध्ये 1 ते 2 हजार अधिक द्यावे लागू शकतात.
Published at : 14 Feb 2025 02:19 PM (IST)
आणखी पाहा























