एक्स्प्लोर
Gadchiroli : गडचिरोलीतील टॅक्सी ड्रायव्हर ते लीड्स विद्यापीठ, खेड्यातील मुलीचा प्रेरणादायी प्रवास
Gadchiroli Kiran Kurmawar Success Story : गडचिरोलीमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या किरण कुर्मावार हिचा ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

Gadchiroli Kiran Kurmawar Success Story
1/8

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावातील टॅक्सी ड्रायव्हर किरण कुर्मावार अखेर आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाली आहे.
2/8

किरण पुढील दोन वर्षे इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात एमएस्सी इन मार्केटिंग मँनेजमेंट या विषयाचा अभ्यास करणार आहे.
3/8

परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर किरणची उच्च शिक्षणासाठी केवळ पैशाअभावी होणारी होलपट प्रथम एबीपी माझाने दाखवली आणि त्यानंतर तात्काळ राज्य सरकारच्यावतीने किरणला 40 लाख रुपयांची शिष्यृवत्ती मंजूर करण्यात आली.
4/8

एबीपी माझाने सहा महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील किरणच्या रेगुंठा गावात जाऊन किरणची परिस्थिती समोर आणणारा ग्राऊंड रिपोर्ट तयार केला.
5/8

त्यानंतर या रिपोर्टची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला.
6/8

एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन या विषयावर सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत आदिवासी मुलीची शिक्षणासाठी होणारी हेळसांड याकडे सरकारचं लक्ष वेधलं.
7/8

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरणला मुंबईला बोलावून तिच्या अडचणी समजून घेतल्या आणि तात्काळ सामाजिक न्याय विभागाला आदेश देत किरणला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
8/8

त्यानंतर किरणचं परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 22 Sep 2023 06:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion