Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
दंगलीत हिंदू आणि मुस्लीम पोरांवर केस पडल्या आहेत. नंतर नोकरी व्यवसाय करताना पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यासाठी बाॅसकडे जावं लागतं. मरतोय कोण गरीब माणूस मरत असल्याचे ते म्हणाले.

Aaditya Thackeray : राज्यात प्रशासन व्यवस्था ढासळली आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली असं म्हटलं जाते तेव्हा ते सर्व मुख्यमंत्र्यांकडे जाते. मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. आज एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी (Aaditya Thackeray) औरंगजेब, नागपूर हिंसाचार प्रकरणावरून रोखठोक व्हिजन मांडले. आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभेत प्रश्नोत्तरे, लक्षवेधीला उत्तर दिली जात नाहीत. यामध्ये क्षमता नसेल किंवा भीती वाटत असेल. आमदाराना उत्तरे दिली जात नाहीत, हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न आहे का?
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतो. मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रत्येक घटनेची माहिती येतेच येते. मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून सर्व माहिती येते. मग, दंगलीची माहिती नव्हती का? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, नागपूर हिंसाचारात बांगलादेशीतून ट्विट झालं असं म्हटलं गेलं. भाजपमध्ये असे लोक आहेत का अंडरमाईन करत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली.
आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही
त्यांनी पुढे सांगितले की, कबरं खोदली पाहिजे म्हणतात, मग यामध्ये कार्यकर्ते पुढे राहणार. मात्र, भाजपमधील नेते, मंत्र्यांची अधिकतर परदेशात शिकली आहेत. काही परदेशात व्यवसायात आहेत. दंगलीत हिंदू आणि मुस्लीम पोरांवर केस पडल्या आहेत. यांनाच नंतर नोकरी व्यवसाय करताना पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यासाठी बाॅसकडे जावं लागतं. मरतोय कोण गरीब माणूस मरत आहे. आगी लावणाऱ्यांचे काही जात नसल्याचे ते म्हणाले.
ठाण्याबद्दल प्रेम आहे, आम्हीही ठाण्याचे आहोत
महाराष्ट्राच्या अंडरमाईन करणं बरोबर नाही. मुख्यमंत्री बोलतात ते अंतिम असतं, मग उपमुख्यमंत्री का बोलतात? खूर्च्या बदलल्या म्हणतात, अजित पवारही जाणून करून देतात. हा आग लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आमचं फक्त नागपूर नाही, विदर्भावर प्रेम आहे. तसेच ठाण्याबद्दल प्रेम आहे, आम्हीही ठाण्याचे आहोत. भेटीला जात असताना आम्ही रात्री वेश बदलून हुडी घालून जात नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

