एक्स्प्लोर

नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक

Nagpur Violance Update : नागपूरचा हिंसाचार प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती समोर आली असून ही दंगल नियोजनबद्द (Nagpur Riots) असल्याचे पुढे आले आहे.

Nagpur Violance Update : नागपूरच्या (Nagpur) महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. मात्र, नागपूरचा हिंसाचार प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती समोर आली असून ही दंगल नियोजनबद्द (Nagpur Riots) असल्याचे पुढे आले आहे. अशातच नागपूर हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद इंजिनिअर  व मोहमद शहजाद खान दोंघांना आता अटक करण्यात आली आहे.

युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भीती पसरवत असल्याचे उघड 

सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हिंसाचाराचा कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हमीद इंजिनिअर हा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी समाजात भीती पसरवत असल्याचे यात दिसून आले आहे. तो लोकांना मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याची विंनती करत होता. त्यात त्यानं गाझा देणगीची मागणी केली, हे सायबर तपासात पुढे आले आहे. 

मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक   

नागपुरात जो हिंसाचार झाला, जे वातावरण निर्माण करण्यात आलं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करण्यात आलं. त्या संदर्भात दुपारीच सोशल मीडिया योग्य पद्धतीने ट्रॅक केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर भाष्य केलं. ते एबीपी माझाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र माझा, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरुन हे प्रकरण चिघळलं असल्याचे मत मांडले होते. अशातच आता पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पैकी एक फहीम खान हा हमीद इंजीनिअरच्या पक्षाचा सदस्य असल्याने  हिंसाचाराचे तार जुडतांना दिसत आहे.

तर नागपूरचा हिंसाचार हा नियोजनबद्द (Nagpur Riots) असल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराच्या आधी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करत आहे. अशी अनेक सोशल मिडिया खाती आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. अशातच ही मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस पहिल्यांदाच आज नागपुरात

औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर  आज (22 मार्च)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होणार आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून  नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील विद्यमान परिस्थितीची व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितलं जातंय.

हे ही वाचा 

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उद्घाटनाआधीच मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
उद्घाटनाआधीच मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC Score : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
CSK vs DC IPL 2026 : पहिला विजय अखेर मिळाला! सॅमसन-ओव्हर्टनच्या जादूने चेन्नईचा ‘क्लायमॅक्स’ जिंकला, दिल्लीचा खेळ खल्लास
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget