एक्स्प्लोर
Lok Sabha Election 2024: रणरणत्या उन्हात उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी; पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावल्या
Vidarbha Lok Sabha Election : विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचार आता थांबला आहे.

( Image Source : Facebook)
1/10

अठराव्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर या निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या आहे.
2/10

त्यामुळे उरलेल्या वेळात अधिका-अधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ होतांनाचे चित्र आहे. तर त्याकरिता आता पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारत आहेत.
3/10

आज रामनवमी निमित्या नागपूरचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.
4/10

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी देखील नागपूर मतदारसंघातील कामगार कॉलनीतील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणारे सर्वसामान्यांचे “रामराज्य” येवो अशी प्रार्थना केली.
5/10

अशातच आज नागपूर येथील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेच्या निमित्याने महायुतीतील भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी एकत्र येत श्रीरामाचे दर्शन घेतले.
6/10

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होताना दिसत आहे. आज काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी देखील आज मंदिरात जाऊन श्रीरामाची पूजा केलीय.
7/10

भंडारा-गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं डॉ. प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीनं सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी आज मोठ्या ताकदीने शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढल्या.
8/10

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण गडचिरोली शहरातून पाच किमी रॅली काढण्यात आली. उन्हाच्या कडक्यात पण काँग्रेसने धडाक्यात प्रचार केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आदिवासी नृत्यात भाग घेतला
9/10

तर याच मतदारसंघात माहितीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्याप्रचारार्थ भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई, आंबेडकरी अनुयायी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीच्या नेत्यांनी मोठा शक्ती प्रदर्शन केलं.
10/10

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी राम नवमीच्या शुभदिनी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी स्वत: दुचाकी चालवली.
Published at : 17 Apr 2024 07:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion