एक्स्प्लोर

Father kills son: बापाने 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या खुनासाठी चाकूसह ब्लेडचा केला वापर; गळा चिरून फेकलं मग लॉजवर गेला..., पुण्यात IT इंजिनिअरचं संतापजनक कृत्य

Father kills son in Pune:चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणाऱ्या भांडणातून पित्यानेच पोटच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या खुनासाठी नराधम बापाने चाकूसह ब्लेडचा वापर केला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.

पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरात पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असं खून झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणाऱ्या भांडणातून पित्यानेच पोटच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या खुनासाठी नराधम बापाने चाकूसह ब्लेडचा वापर केला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.

माधव साधुराव टेकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे या पित्याचे नाव आहे. 20 ते 21 मार्च दरम्यान ही घटना घडली. आरोपीने चिमुकल्याचा खराडीतील फॉरेस्ट पार्क परिसरात चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. रात्रीचे नऊ वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने पत्नीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांतर पोलिसांनी चौकशी केली तपास केला त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. या गुन्ह्यांत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात आली आहे. टेकेटी यास अटक करून शनिवारी (ता. 22) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे दिलीप गायकवाड यांनी केला. न्यायालयाने टेकेटी याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात युक्तीवाद करताना दिलीप गायकवाड म्हणाले, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीने स्वतःच्या मुलाचे अपहरण करून त्यास निर्जनस्थळी नेऊन त्याचा गळा कापून खून केला आहे. त्याने तो चाकू कोठून आणला? तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी कोठे आहे? याबाबत तपास करायचा आहे. गुन्हा करताना त्याच्या अंगावर असलेले कपडे त्याने कोठे टाकले? याचा तपास करायचा असून, ते हस्तगत करायचे असल्याने आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी गायकवाड यांनी केली. 

चारित्र्यावर सतत संशय अन्...

माधव पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताच, चंदनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असल्याचे सांगितले. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय आला. दरम्यान पोलिस पथकाने माधवला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली.

असा झाला खुनाचा उलगडा

माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Suryakumar Yadav :  ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून Video शेअर
ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून व्हिडिओ शेअर
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Embed widget