एक्स्प्लोर
Maoist Blast : गडचिरोलीच्या सीमारेषेवर माओवाद्यांच्या स्फोटात 2 जवान शहीद, भीषण घटनेचे फोटो समोर
नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला, त्यामध्ये वाहनचालक विष्णू आणि आरक्षणक शैलेंद्र शहीद झाले असून घटनास्थळी तत्काळ सुरक्षा दलाचे पथक पाठवण्यात आले होते.

maoist blast in sukuma
1/6

जिल्ह्याती सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी (Naxal) मोठा आयईडी स्फोट केलाय. या स्फोटात दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहेत.
2/6

नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला, त्यामध्ये वाहनचालक विष्णू आणि आरक्षणक शैलेंद्र शहीद झाले असून घटनास्थळी तत्काळ सुरक्षा दलाचे पथक पाठवण्यात आले होते. दोन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
3/6

201 कोब्रा वाहिनीची ऍडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटी दरम्यान ट्रक आणि मोटारसायकलने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होती.
4/6

सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. दरम्यान,आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास 201 कोब्रा कॉर्प्सच्या एक ट्रकवर आयईडी स्पोट घडवून आणला.
5/6

नुकतेच सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी (Anti-Naxalite Campaign) अभियानाला मोठे यश मिळाले आहे.
6/6

दरम्यान, आज माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटाचे फोटो समोर आले असून त्यांमध्ये वाहनांचा चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे.
Published at : 23 Jun 2024 08:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धुळे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
